अखेर रिसोड – शिरपूर – वाशिम एसटी सुरू : वैष्णव भांगडिया यांच्या प्रयत्नांना यश
भाजप किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य वैष्णव भांगडिया यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अकोल्याचे विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ यांना रिसोड – शिरपूर – वाशिम एसटी सुरू करण्यात यावी यासाठी २ वेळच्या फेरी बाबत निवेदन देण्यात आले होते ज्यामध्ये रिसोड ते वाशिम सकाळी ७.३० वाजता व वाशिम ते रिसोड सायंकाळी ५.०० वाजता असा उल्लेख त्यांनी केला होता परंतु विभागाद्वारे हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य नाही असे पत्र त्यांना प्राप्त झाले. मात्र त्यानंतर भांगडिया यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांच्यासोबत या विषयावर सविस्तरपणे चर्चा केली व त्यांना ह्या मार्गावर एसटी सुरू करणे किती महत्वाचे आहे हे पटवून सांगितले.
या भेटीनंतर त्यांनी एसटीचे मुख्य व्यवस्थापक माधव कुसेकर यांना सुद्धा पत्रव्यवहार केला ज्या नंतर कुसेकर यांनी अकोला विभागाला एसटी सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले व सोबतच उपमुख्यमंत्र्यांचे पत्र सुद्धा महामंडळाला प्राप्त झाले. मुख्यव्यवस्थापक यांच्या आदेशानंतर प्रशिक्षण वाहनाने पुन्हा एकदा पाहणी करण्यात आली.
महावितरण तारांची व काही झाडांची अडचण या मार्गावर आहे व ते एसटीला धोकादायक ठरू शकते असे या पाहणी अवहालातून भांगडिया यांना कळविण्यात आले. ज्यानंतर फक्त ८ दिवसांमध्ये त्यांनी एसटीला उद्भवलेल्या सर्व अडचणींना दूर करण्यात आले ज्यामध्ये महावितरण विभागाचा महत्वाचा वाटा होता. सर्व अडचणींना दूर केल्यानंतर पुन्हा एकदा रा.प. अकोला विभाग नियंत्रक यांना पत्रव्यवहार करण्यात आला.
अडचणींना दूर करण्यासाठी महावितरण अधिकारी व कर्मचारी तायडे, रवी खाडे, परळकर, ईश्वर ठाकूर तसेच सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर उल्हामाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पत्रव्यवहार केला असता पुन्हा एकदा प्रशिक्षण वाहन चालवून शेवटची पाहणी ठरलेली धाव या मार्गावर झाली व अहवाल सकारात्मक आला आणि रिसोड आगार व्यवस्थापक दादाराव दराडे यांना एसटी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. यामध्ये वाहतूक नियंत्रक पवन लाजूरकर, डी.आय. दीपक विटकरे, प्रकाश साखरकर, रिसोड आगार व्यवस्थापक दादाराव दराडे, प्रशांत इंगोले इत्यादी कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.
अखेर १६/०३/२०२४ रोजी ह्या एसटीने या मार्गावर धाव घेतली आणि करंजी येथे चालक आणि वाहक यांचा सत्कार वैष्णव भांगडिया यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला.
या एसटीच्या सुरू होण्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, वयोवृद्ध, महिला, शेतकरी व सर्व वर्गातील लोकांना याचा फायदा होईल व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या महसुलात चांगलीच भर पडेल असा विश्वास वैष्णव भांगडिया यांनी व्यक्त केला व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. या रस्त्यावरील सर्व गावांच्या गावकऱ्यांनी वैष्णव भांगडिया यांचे धन्यवाद आणि एसटी सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी तुळशीराम लहाने, नारायण विढोळे, लक्ष्मण खाडे, श्रीराम लहाने, भगवान लहाने, उमेश लहाने, सूरज लहाने, गणेश लहाने, राजू लहाने, रतनसिंह बयस, नारायण सुरुशे, किशोर लहाने, अश्रू विढोळे, बबन खिल्लारे, तुळशीराम लहाने, सरदारसिंह बयस, माधव लहाने, निखिल लहाने, रामेश्वर लहाने, प्रमोद देशमुख, आशिष खाडे, पांडुरंग लहाने, भानुदास लहाने, प्रदीप लहाने, जनार्दन लहाने, गजानन माळेकर, प्रवासी व गावकरी मंडळी उपस्थित होते.