झाडे कापण्याआधी आमचे मस्तक कापा; वैष्णव भांगडीया यांचा मुख्याधिकाऱ्यांना तीव्र हरकत अर्ज सादर!

राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ (अकोला–हिंगोली रोड) च्या नूतनीकरणाच्या नावाखाली प्रस्तावित करण्यात आलेल्या वृक्षतोडीविरोधात वाशिममध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत असून, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक वैष्णव भांगडीया यांनी नगर परिषद वाशिमचे मुख्याधिकारी यांना अत्यंत कठोर शब्दांत हरकत…



